InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्र्यांच्या प्रवासा दौऱ्यांवर ३९३ कोटींचा खर्च

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात अनेक परदेश दौरे केले. यावरून त्यांच्यावर अनेकांनी टीका केली आहे. आता नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्र्यांनी प्रवासावर केलेल्या खर्चाची माहिती समोर आली आहे.

नरेंद्र मंत्रिमंडळातील मंत्री व राज्यमंत्र्यांनी गेल्या ५ वर्षांत केलेल्या परदेश व देशांतर्गत प्रवासावर ३९३ कोटी ५७ लाख ५१ हजार ८९० रुपये खर्च झाला. विदेश दौऱ्यांवर २९२ कोटी रुपये, तर देशांतर्गत प्रवासावर ११० कोटी रुपये खर्च झाला. माहिती अधिकारात ही माहिती उघड झाली आहे.

कॅबिनेट मंत्र्यांच्या परदेश प्रवासावर गेल्या पाच वर्षांत २६२ कोटी ८३ लाख १० हजार ६८५ रुपये , तर देशांतर्गत प्रवासांवर एकूण ४८ कोटी ५३ लाख ९ हजार ५८४ रुपये खर्च झाले. राज्यमंत्र्यांच्या परदेश प्रवासांवर २९ कोटी १२ लाख ५ हजार १७० रुपये, तर देशांतर्गत प्रवासांवर ५३ कोटी ९ लाख २६ हजार ४५१ रुपये खर्च झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply