InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

मदरशांतील विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशीपसाठी 3E योजना

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दुसऱ्या टर्ममध्ये अल्पसंख्याक विद्यार्थांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नवी योजना आखली आहे. मदरशांचा चेहरा-मोहरा बदलण्याच्या दृष्टीने मोदी सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत.

- Advertisement -

मदरशांमधील पाच कोटी विद्यार्थ्यांना पुढील पाच वर्ष स्कॉलरशीप देण्यासाठी 3E योजना मोदी सरकारने आखली आहे, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी दिली.

3E म्हणजे एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट आणि एम्पावरमेंट. यामध्ये 50 टक्क्यांहून अधिक मुलींचा समावेश केला जाणार आहे. या योजनेद्वारे केंद्र सरकार पाच कोटींहून अधिक गरीब अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप देणार आहे. त्यामुळे एका कुटुंबातील एक विद्यार्थ्यांने चांगलं शिक्षण घेतलं, तर त्याचा फायदा संपूर्ण कुटुंबाला होईल. या योजनेद्वारे अल्पसंख्याक मुलांसाठी ‘पढो और बढो’ हे अभियान राबवले जाणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.