InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

आंध्र सरकारची आंतरजातीय विवाहासाठी 41 कोटींची तरतूद

आंध्र प्रदेशातील सत्ताधारी वायएसआर काँग्रेस पक्षाने वायएसआर राज्यातील पहिले बजेट आंध्र प्रदेश विधानसभेत आज मांडले. या बजेटमध्ये आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 41 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे आंध्र प्रदेशमध्ये आंतरजातीय विवाहाचे प्रमाण वाढेल, अशी आशा व्यक्त केली आहे.

अनुसूचित जातीच्या मुलाने अनुसूचित जातीच्या मुलीसोबत लग्न केलं तर सरकार त्याला 40 हजार रुपये देत होते. इतर मागासवर्गीय मुलाने इतर मागासवर्गीय मुलीसोबत लग्न केलं तर सरकारकडून 30 हजार रुपये दिले जात होते. मात्र आता नव्या बजेटच्या तरतुदीनुसार ही रक्कम वाढणार असल्याचे बोललं जात आहे.

दरम्यान, आंध्र प्रदेशचे अर्थमंत्री बुग्गना राजेंद्रनाथ यांनी आज विधानसभेत बजेट सादर केले. या बजेटमध्ये आंध्र प्रदेशमधील जनतेसाठी अनेक गिफ्ट सरकारने दिली आहेत. विशेष म्हणजे यामध्ये शेतकऱ्यांसाठी सरकारने 18 हजार 330 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply