InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

डोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख तर जखमींना 50 हजार

- Advertisement -

डोंगरी येथे मंगळवारी सकाळी केसरबाई इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 21 जण जखमी आहेत. मंगळवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. जखमींना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. काल दुपारपासून सुरु असलेले बचावकार्य रात्री उशीरापर्यंत सुरू होते. मात्र अद्यापही ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मृतांच्या कुटुंबीयांसाठी 5 लाख रुपये आणि जखमींसाठी 50,000 रुपयांमध्ये मदत जाहीर केली आहे. यासोबतच जखमींवरील उपचार राज्य सरकारकडून देणार असल्याची घोषणा करण्यात आली.

- Advertisement -

मुंबईत पावसामुळे अनेक दुर्घटना घडत आहेत. यामध्ये आता डोंगरी दुर्घटनेचाही समावेश झाला आहे. स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर येथे अग्निशमन दल आणि एनडीआरएफचे जवान दाखल झाले होते. येथे 45 जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. यानंतर येथे बचावकार्य सुरू करण्यात आले. आतापर्यंत 21 जखमींना वाचवण्यात यश आले आहे. तर आता स्निफर डॉग्सच्या मदतीने शोधकार्य सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.