InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘५० कोटी रुपये द्या, मोदींची हत्या करण्यास तयार’

‘५० कोटी रुपये द्या, मोदींची हत्या करण्यास तयार आहे, असे बोलतानाचा बीएसएफचे बडतर्फ जवान तेजबहादूर यादव यांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

तेज बहादूर यांनी या व्हिडीओतील व्यक्ती मीच असल्याचे म्हटले आहे. 2017 मध्ये मला न सांगता हा व्हिडीओ शूट करण्यात आला असून, मात्र हत्येविषयी मी बोललो नव्हतो. व्हिडीओमध्ये छेडछाड करण्यात आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

व्हिडिओत तेजबहादूर हे एका व्यक्तीशी गप्पा मारताना दिसत आहे. “मला पैसे द्या, मी मोदींची हत्या करण्यास तयार आहे. मला ५० कोटी रुपये द्या”, असे तेजबहादूर यादव बोलताना दिसत आहेत. यावर समोरील व्यक्तीने “मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत आणि फक्त पाकिस्तानसारखे शत्रूराष्ट्रच मोदींच्या हत्येसाठी ५० कोटी रुपयांची सुपारी देतील”, असे सांगितले. यावर तेजबहादूर यांनी सांगितले की, मी देशाशी गद्दारी करणार नाही. मी असे कोणतेही कृत्य करणार नाही. मला एखाद्या भारतीय व्यक्तीने पैसे दिल्यावरच मी हत्या करण्यासाठी तयार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.