InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

पुण्यातील मराठा संवाद यात्रा दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार

- Advertisement -

सकाळी नऊ वाजाता पुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात झाली आहे. दहा दिवसांमध्ये विधान भवनावर ही संवाद यात्रा धडकणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून मराठा संवाद यात्रा निघणार आहे. राज्यभरात आजपासून सुरू होणाऱ्या या यात्रा २६ नोव्हेंबर रोजी मुंबईतमध्ये विधान भवनावर धडकणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने या संवाद यात्रांचं आयोजन करण्यात आलं आहे.

राज्य सरकारने मराठा आरक्षणाची अधिकृत घोषणा आणि इतर विविध प्रकारच्या मागण्या अद्यापही पूर्ण केल्या नसल्यानं मराठा समाजात जनजागृती करण्यासाठी या यात्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यात मागील दोन वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे. या मागणीसाठी मोर्चे काढण्यात आले असून राज्य सरकारने यासाठी एक समिती नियुक्त केली होती.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.