InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

वामन हरी पेठे ज्वेलर्समधून 58 किलो सोन्याची चोरी

येथील वामन हरी पेठे ज्वेलर्समधून तब्बल 58 किलो सोने चोरीला गेल्याची घटना घडली आहे. औरंगाबादमधील समर्थनगर येथील वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या दुकानातून 27 कोटी रुपयांचे 58 किलो सोने चोरीला गेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी ज्वेलर्सचा मॅनेजर आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

वर्षभरापूर्वी ही जबरी चोरी झाल्याचे सांगण्यात येत असून, या गुन्ह्याची नोंद आज झाली आहे. मात्र वर्षभरापासून गुन्हा का दाखल केला नव्हता हा खरा प्रश्न आहे. या चोरीचा संशय मॅनेजरवर होता, त्यामुळे त्याची चौकशी सुरू होती. पण मॅनेजर उडवा-उडवी करु लागल्याने अखेर त्याच्याविरोधात आज गुन्हा दाखल झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply