5G Internet | या महिन्यात सुरु होणार 5G इंटरनेट सेवा?, पहा ‘ही’ कंपनी करणार 5G लाँच

महाराष्ट्र देशा डेस्क: देशात 5G इंटरनेट सेवा सुरु होण्याची वाट सर्वच जण बघत आहेत. हीच प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे. कारण या महिन्यातच देशात 5G सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. देशातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम असलेली एअरटेल ही कंपनी सुरू करणार आहे. यासाठी कंपनीने नोकिया, एरिक्सन आणि सॅमसंग या कंपन्यांसोबत करार केले आहेत. दुसरीकडे जिओने सुद्धा 15 ऑगस्टपासून देशभरात 5G नेटवर्क सेवा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. 5G लाँच झाल्यानंतर इंटरनेटचा वेग वाढणार आहे.

एअरटेलचे एमडी आणि सीईओ गोपाल विट्टल म्हणाले की, देशातील ग्राहकांना 5G इंटरनेटचा चांगली सेवा देण्यासाठी आमची कंपनी जगभरातील सर्वोत्तम तंत्रज्ञान असलेल्या भागीदारांसोबत काम करेल. त्यामुळे आता लवकरच भारतातही 5G सेवेचा लाभ घेता येणार आहे.

5G चे दर किती असणार?
दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की 5G सेवांचे दर टॅरिफ इंडस्ट्रीद्वारे ठरवले जातील. मात्र 5G इंटरनेटसाठी सुरुवातीला 4G सेवेच्या 10%-15% जास्त दार आकारले जातील, असे अंदाज तज्ञांनी सांगितले आहे. तर 5G इंटरनेट सेवा सुरू झाल्यावर भारतात बरेच बदल होतील. त्यामुळे लोकांची कामे सोपी होणार असून मनोरंजन आणि ट्रॅव्हल क्षेत्रातही खूप बदल होतील. एरिक्सन या 5G साठी काम करणार्‍या कंपनीचा विश्वास आहे की 5 वर्षांत भारतात 500 दशलक्ष 5G इंटरनेट वापरकर्ते असतील.

5G मुळे व्हिडिओ गेमिंगच्या क्षेत्रात मोठा बदल होणार आहे. तसेच व्हिडिओ बफरिंग देखील होणार नाही. इंटरनेटद्वारे कॉल केल्यावर स्पष्टपणे आवाज येईल. सर्वात महत्वाचे म्हणजे 2 GB चा चित्रपट 10 ते 20 सेकंदात डाउनलोड होईल. व्हर्च्युअल रिॲलिटी आणि कारखान्यांमध्ये रोबोट्स वापरणे सोपे आणि परवडणारे होईल.

महत्वाच्या बातम्या:

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.