InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

65th national film awards : कच्चा लिंबू सर्वोत्तम मराठी सिनेमा,नागराज पुन्हा चमकला

स्पेशल मेन्शन (विशेष दखल) (फीचर फिल्म) - म्होरक्या - यशराज कऱ्हाडे

टीम महाराष्ट्र देशा- 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात येत आहे. नवी दिल्लीतील शास्त्री भवनमध्ये पुरस्कार जाहीर केले जात आहेत. दरवर्षीप्रमाणे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटांनी ठसा उमटवला आहे.अभिनेता प्रसाद ओकचं दिग्दर्शनातलं पदार्पण असलेल्या कच्चा लिंबू चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. नागराज मंजुळे यांनी पुन्हा राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी घातली आहे. नागराज मंजुळेंना पावसाचा निबंध या शॉर्ट फिल्मसाठी दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला.

संपूर्ण भारतीय कलाविश्वाचं लक्ष लागून राहिलेल्या मानाच्या ६५ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा दिल्लीच्या शास्त्री भवनातील पीआयबी कॉन्फरन्स रुम येथून करण्यात आली. चित्रपट क्षेत्रातील विविध विभागांसाठी हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. अभिनेता प्रसाद ओकचं दिग्दर्शनातलं पदार्पण असलेल्या कच्चा लिंबू चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. मंदार देवस्थळी निर्मित या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, दिग्दर्शक रवी जाधव यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.

मराठी पाऊल पडते पुढे …

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – कच्चा लिंबू

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – न्यूटन (निर्माता – अमित मसुरकर)

स्पेशल मेन्शन (विशेष दखल) (फीचर फिल्म) – म्होरक्या – यशराज कऱ्हाडे

सर्वोत्कृष्ट संकलन – मृत्युभोग

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (शॉर्ट फिल्म) – पावसाचा निबंध – नागराज मंजुळे

सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म (नॉन फीचर) – मयत – सुयश शिंदे

सर्वोत्कृष्ट प्रमोशनल चित्रपट – चंदेरीनामा- राजेंद्र जंगले
मराठमोळा निर्माता अमित मसुरकरचा सिनेमा न्यूटनला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.

बॉलिवूडमधील पुरस्कार :

सर्वोत्कृष्ट साहसी दृश्यं – अब्बास अली मोगल – (बाहुबली 2)

सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स- बाहुबली 2

सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन – गणेश आचार्य (गोरी तू लाथ मार – टॉयलेट एक प्रेम कथा)

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – न्यूटन

स्पेशल मेन्शन (विशेष दखल) (फीचर फिल्म) – अभिनेता पंकज त्रिपाठी (न्यूटन- हिंदी)

इतर पुरस्कार :

सर्वोत्कृष्ट गाणं – ए.आर. रहमान – मॉम (तमिळ)

सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोअर- ए.आर. रहमान- मॉम (तमिळ)

स्पेशल मेन्शन (विशेष दखल) (फीचर फिल्म) – हेल्लो अर्सी (उडिया)- प्रकृती मिश्रा

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचं पदार्पण – वॉटर बेबी – पिया शाह

सर्वोत्कृष्ट मानववंशशास्त्रावरील चित्रपट- नेम, प्लेस, अॅनिमल, थिंग

सर्वोत्कृष्ट कला आणि संस्कृती – गिरीजादेवी डॉक्युमेंट्री

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर होते. दहा दिग्गजांचाही या समितीत समावेश आहे. 3 मे 2018 रोजी हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.