“केंद्राकडून 700 कोटीचा निधी आला आहे, आधी मदत करा”

कोल्हापूर : मागील आठवडयात मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे कोकण, सातारा तसेच, कोल्हापूरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच नुकसानाची ओहनी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरचा दौरा केला. त्यावेळी दोघांची अचानक भेट झाली. त्यानंतर फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी केली आहे.

“दोन दिवस या भागाचा दौरा केल्यानंतर परस्थिती गंभीर असल्याचं लक्षात येतंय. अलमट्टी, राधानगरी आणि कोयना धरण भरण्यापूर्वीच या भागाला पूराचा फटका बसलाय. हे चित्र गंभीर आहे. राज्याने या भागात मदत तर दिलीच पाहिजे. पण, त्याचबरोबर या भागात कायमस्वरूपीची मदत देण्याची गरज आहे,” असं फडणवीसांनी सांगितलं आहे.

“सर्वेक्षण, अभ्यास या गोष्टी केल्याचं पाहिजे, पण त्याआधी यांना तातडीची मदत देणं गरजेचं आहे. केंद्राकडून 700 कोटीचा निधी आला आहे, पंरतु राज्याने अद्याप कोणतीही मदत दिली नाही. दुपारी मुख्यमंत्र्यांशी काही क्षण चर्चा झाली. मुख्यमंत्री लवकरच याची घोषणा करतील अशी अपेक्षा आहे,” असंही फडणवीस म्हणाले.

दरम्यान, कोल्हापूरातील चिखली गावातील ग्रामस्थांनी फडणवीसांना खडेबोल सुणावले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूर दौऱ्यावर असताना नागरिकांच्या रोषाला सामोरे जाव लागलं आहे. “मारूतीच्या साक्षीने तुम्ही शब्द देऊन गेला पण दोन वर्ष बघितलं नाही आणि आता परत आलाय,” असं म्हणत एका ग्रामस्थानं खडेबोल सुनावले.

महत्वाच्या बातम्या 

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा