75 Rupees Coin | नव्या संसदेच्या उद्घाटनानिमित्त लॉन्च होणार 75 रुपयांचं नाणं, जाणून घ्या सविस्तर

75 Rupees Coin | दिल्ली: नवीन संसद भवनाचे उद्घाटन 28 मे रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या उद्घाटन सोहळ्यानिमित्त केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. गुरुवारी (25 मे) अर्थ मंत्रालयाने नवीन संसद भवनाच्या स्मरणार्थ 25 रुपयांचं नाणं जारी केलं जाणार असल्याची घोषणा केली आहे.

75 rupees coin will be launched on the occasion of the inauguration of the new Parliament

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनानिमित्त 75 रुपयाचं नाणं (75 Rupees Coin) जारी केलं जाणार आहे. या नाण्याचा आकार गोलाकार असून त्याचा व्यास 44 मिमी असेल. त्याचबरोबर हे नाणं चार धातूंच्या मिश्रणापासून बनवलेलं असेल. यामध्ये चांदी, तांबे, निकेल आणि झिंक या धातूंचा समावेश आहे. या नाण्याचं वजन साधारण 35 ग्रॅम असेल.

75 रुपयाच्या नाण्याच्या (75 Rupees Coin) पुढील बाजूच्या मध्यभागी अशोक स्तंभ आणि सत्यमेव जयते लिहिलेले असेल. त्याचबरोबर या नाण्यावर देवनागरी लिपीत ‘भारत’ आणि इंग्रजीमध्ये ‘इंडिया’ असे लिहिलेलं असेल. तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला भारतीय रिजर्व बँक  लिहिलेलं असेल.

दरम्यान, नवीन संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार असल्यामुळे राजकीय वर्तुळात गदारोळ झाल्याचं दिसत आहे. राष्ट्रपतींनी या संसद भवनाचे उद्घाटन करावं, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्याचबरोबर हे उद्घाटन नरेंद्र मोदी करत असल्यामुळे या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3BTOleC