‘…80 टक्के भाग गायब होईल’; मुंबई महापालिका आयुक्तांची भीतीदायक भविष्यवाणी

मुंबई : वातावरणीय बदलांमुळे समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होऊन मुंबईतील ए, बी. सी आणि डी वार्डमधील 80 टक्के भाग पाण्याखाली जाईल, अशी भविष्यवाणी मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चह यांनी केली आहे.
मुंबई वातावरणीय बदल अ‌ॅक्शन प्लॅन योजनेच्या वेबसाईटचं लाँचिंग करण्यात आलं. यावेळी बोलताना त्यांनी मुंबईकरांना इशारा दिला आहे.

‘निसर्गाच्या इशाऱ्यानंतरही लोक जागरुक झाले नाहीत तर परिस्थिती धोकादायक होईल. कफ परेड, नरीमन पॉईंट आणि मंत्रालय हा भाग 80 टक्के पाण्याखाली असेल म्हणजे गायब होईल,’ असं इकबाल सिंह चहल यांनी म्हटलं आहे.

पुढे ते म्हंटले की, ’25 ते 30 वर्षांची बाब राहिली आहे कारण 2050 काही लांब राहिलेलं नाही. आपल्याला निसर्गाकडून वारंवार इशारे मिळत आहेत, आपण त्यावर काम केलं नाही तर पुढील 25 वर्षात परिस्थिती गंभीर होईल. यामुळे पुढची नाही सध्याची पिढी देखील प्रभावित होईल,’ असं चहल यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा