InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मुंबईत सिडकोची 86 हजार 700 घरांची लॉटरी

मुंबईत घरं घेणं म्हणजे स्वप्न असतं. सर्व सामान्यांना मुंबईत घर घेणं परवडत नाही. त्यामुळे सिडको आणि म्हाडा घरांसाठी लॉटरी काढत असतात. ऑगस्ट महिन्यात सिडको घरांसाठी लॉटरी काढणार असून ही लॉटरी तब्बल 86 हजार 700 घरांची लॉटरी निघणार आहे. याचा आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांना फायदा होणार आहे.

सिडको येत्या पाच वर्षात 90 हजार घरांची निर्मिती करणार आहे. त्यातल्या 86 हजार 700 घरांची सोडत ऑगस्टमध्ये काढण्यात येणार आहे. या सोडतीचं नियोजन पूर्ण झालंय. एवढ्या मोठ्या प्रमाणात सिडको आर्थिक दृष्ट्या दुर्बल तसेच अल्प उत्पन्न गटांसाठी घरे उपलब्ध करून देत आहे.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply