InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘या’ ९ महिन्याच्या बाळाच्या मृत्यूचे कारण ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी येईल!

नाशिक जिल्ह्यात डेंग्यूने थैमान घातलं आहे. गेल्या काही दिवसात शहरात पाचशेहुन अधिक जणांना डेंग्यूची लागण झाल्याचं समोर आलं आहे. आज डेंग्यूमुळे एका नऊ महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अशरफ शेख असं या नऊ महिन्याच्या बाळाचं नाव आहे. अशरफला डेंग्यूची लागण झाली होती. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज उपचारादरम्यान अशरफची प्राणज्योत मालवली. नऊ महिने जग पाहिलेल्या या बाळाच्या मृत्यूमुळे शेख कुटुंबियावर दुखाचा डोंगर कोसळला.

गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात डेंग्यूने थैमान घातलं आहे. तसंच जिल्ह्यात स्वाईन फ्लूमुळे बळीचा आकडा ३० वर पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वीच एकाच दिवसात उपचार घेत असणाऱ्या तिघांचा मृत्यू झाला होता. यातील एक भाजपच्या येवला नगराध्यक्षांचा भाऊ होता. नाशिकचं जिल्हा सामान्य रुग्णालयात जनरल तपासणी कक्षात गेल्या महिन्याभरापासून रुग्णांची गर्दी ही वाढतंच चालली आहे. यातील बहुसंख्य रुग्ण हे तापाचे रुग्ण आहे. यातील 216 रुग्णांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे.

मात्र या स्वाईन फ्ल्यू वॉर्डमधील परिस्थिती तर अधिकच चिंताजनक झाली आहे. या वॉर्डमध्ये सध्या 14 रुग्णांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू असला तरी दररोज 1 रुग्ण मृत्युमुखी पडतोय. दूषित पाणी,अंगावर ताप काढणं,रोग प्रतिकारशक्ती कमी होणं अशी अनेक कारणं आरोग्य यंत्रणा देत असल्या तरी स्वाईन फ्ल्यूची दहशत कमी करण्यात आरोग्य यंत्रणा अपयशी ठरल्या आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.