InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

माझ्यावरील हल्ल्याला केंद्रातील भाजप सरकारचा सुरक्षेतील निष्काळजीपणा जबाबदार – केजरीवाल

- Advertisement -

अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी सुरक्षेतील निष्काळजीपणाला केंद्रातील भाजपा सरकार जबाबदार धरले असून आम आदमी पार्टी संपविण्याचे षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे.  अरविंद केजरीवाल यांना एका युवकाने प्रचारदरम्यान रोड शो करत असताना श्रीमुखात मारल्याचे कृत्य घडले होते.

गेल्या पाच वर्षात नऊवेळा आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर पाचवेळा हल्ला झाला आहे. देशाच्या इतिहासात अशाप्रकारे कोणत्या मुख्यमंत्र्यांवर हल्ले झाले नसतील. असे हल्ले केल्याने आमचा आवाज बंद होणार नाही किंवा आमचे धाडस संपणार नाही, अशा शब्दांत अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर टीका केली.

Loading...

- Advertisement -

हे हल्ले माझ्यावर नसून दिल्लीत जनतेवर झाले आहेत. जनतेने निवडणूक दिलेल्या मुख्यमंत्र्यावर झाले आहेत. दिल्लीत जनता याचा बदला नक्की घेईल असे देखील केजरीवाल यावेळी म्हणाले.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.