‘5 महिन्याच्या बाळाकडे लक्ष देता येत नाहीये,’ सारा श्रवण भावूक

मराठी अभिनेत्री सारा श्रवणला  सहकलाकाराकडून खंडणी मागितल्या प्रकरणी दुबईतून अटक करण्यात आली होती. पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टात  साराला हजर करण्यात आल्यानंतर तिला पंधरा हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे. जामिनावर सोडण्यात आलेल्या साराने फेसबुक लाईव्हकरून आपल्याला होणारा त्रास प्रेक्षकांसमोर मांडला आहे.

“कोणत्याही कथाकथित गोष्टींवर विश्वास ठेऊ नका. या साऱ्याचा मला आणि माझ्या कुटुंबियांना प्रचंड मनस्ताप होत असल्याचं,’ सांगितलं आहे. ‘या सगळ्याचा मला खूप मनस्ताप झाला आहे. जे खरं आहे, जे खोटं आहे ते कायद्याने जगासमोर येणार आहे. मी माझ्या 5 महिन्याच्या बाळाला नीट वेळही देऊ शकत नाही. मी आता सुखरूप आहे. माझ्या बाळासोबत घरी आहे,’ असं देखील साराने सांगितलं आहे.

 

Sara Shrawan ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಡಿಸೆಂಬರ್ 1, 2019

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.