रानू मंडलवर तयार होणार बायोपिक; ‘ही’ अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका

मुंबई : रातोरात स्टार बनलेल्या रानू मंडल यांच्या गाण्यानंतर आता त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समजतंय. ‘मिस रानू मारिया’ असं या चित्रपटाचं नाव असेल.

‘ऋषिकेश मंडल या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून मुंबई आणि कोलकातामध्ये या चित्रपटाचं शूटिंग पार पडणार आहे. रानू जिथे राहिल्या, तिथेच शूटिंग केलं जाईल,’ अशी माहिती चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिली आहे.

रानू मंडल यांच्या बायोपिकमध्ये अभिनेत्री इशिका डे मुख्य भूमिका साकारणार आहे. इशिकाने याआधी काही हिंदी आणि बांग्ला चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. रानू यांच्या भूमिकेसाठी आधी अभिनेत्री सुदिप्ता चक्रवर्तीला विचारण्यात आलं होतं. मात्र तारखा जुळत नसल्याने अखेर ही भूमिका इशिकाच्या पदरात पडली.

दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. केवळ एका व्हिडीओने त्यांचं आयुष्य बदललं. एवढंच नाही तर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर 10 वर्षांपासून दूर गेलेली त्यांची मुलगीदेखील परतली.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा