InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

प्रियसीचा खून करणाऱ्या प्रियकराला अटक

- Advertisement -

प्रेयसीचे दुसऱ्याशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून प्रियकराने चाकूने वार करून खून केल्याची घटना चंदननगर येथे घडली होती.फरार आरोपी किरण अशोक शिंदे (वय-26, रा. काळेवाडी, थेरगाव पुणे) याला चंदननगर पोलिसांनी नुकतीच अटक केली.

- Advertisement -

चंदननगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 जून रोजी विना पटले या युवतीचा एका तरुणाने चाकूने वार करून खून केल्याची घटना चंदननगर येथे घडली होती. आरोपी खून करून फरार झाला होता. पोलीस तपासानुसार उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज व इतर महत्त्वपूर्ण माहितीवरून हा खून विना पटलेचा मित्र किरण शिंदे यांनी केल्याचे निष्पन्न झाले. सात दिवसांपूर्वी त्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. रावेत येथे एका खासगी दवाखान्यात उपचार घेत असल्याची माहिती चंदननगर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आरोपी किरण शिंदे याला रुग्णालयातून उपचार पूर्ण झाल्यावर ताब्यात घेऊन अटक केली.आरोपी किरण शिंदे याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या गुन्ह्याचा तपास परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू, सहायक आयुक्त डॉ. शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर, गुन्हे निरीक्षक राजेंद्र काळे, उपनिरीक्षक प्रवीण कुलकर्णी सहाय्यक पोलीस फौजदार बारगुजे, पोलीस शिपाई भाऊ चव्हाण व अमित जाधव यांच्या पथकाने केला.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.