InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘त्या’ वक्तव्यावरुन कमल हसन यांच्यावर गुन्हा दाखल

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नावाजलेला अभिनेते कमल हसन “नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता” असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे वादात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच कमल हसन यांना जीवे मारण्याची देखील धमकी देण्यात आली आहे.

कमल हसन यांनी मक्कल निधी मय्यम या राजकीय पक्षाची स्थापना केली असून ते सध्या तामिळनाडूतील मध्यावधी निवडणुकांसाठी जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. अशातच  कमल हसन यांनी चेन्नईतील अर्वाकुरची इथल्या प्रचारावेळी वादग्रस्त विधान केले होते.

सोशल मिडियावर देखील यावर बरीच चर्चा झाली, मात्र यांतून नेटीझन्समध्ये वादंग देखील उठला.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply