InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

फुटीरतावाचा एक दिवसाचा बंद, अमरनाथ यात्रेला स्थगिती

केंद्र सरकारने फुटीरतावाद्यांविरोधात सुरू केलेल्या कारवाईमुळे ते बिथरले असून त्यांनी शनिवारी म्हणजेच आज एक दिवसाचा बंद पुकारला आहे. या बंदमुळे अमरनाथची यात्रा एक दिवसासाठी थांबवण्यात आली आहे. यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना आज जम्मू-कश्मीरमधून जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

8 जुलै 2016 रोजी बुरहान वाणी या कुख्यात दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलं होतं. यावर्षी याच दिवशी फुटिरतावाद्यांनी विरोध प्रदर्शन करण्याचे ठरवले होतं. यामुळे जम्मू कश्मीरमधली बहुतांश दुकाने सोमवारी बंद ठेवण्यात आली होती. इथली परिहवन व्यवस्थाही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या विरोध प्रदर्शनामुळे अमरनाथला जाणाऱ्या भाविकांनाही एक दिवस थांबवण्यात आलं होतं.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply