InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

नेवासा तालुक्यातील देवगाव रोडवर स्त्री जातीचे अर्भक सापडले

नेवासा तालुक्यातील देवगाव रोडवर स्त्री जातीचे अर्भक सापडले आहे. रो हाऊसच्या पाठीमागे या गोंडस मुलीला टाकून दिलेले होते. अगदी दोन-तीन दिवसांची ही चिमुरडी आहे. तिला एका कापडात गुंडाळून टाकण्यात आलं होतं. आशा स्वयंसेविकेने या नवजात मुलीला कुकाणा ग्रामीण रूग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान या मुलीला कोण टाकून गेलं याचा शोध सुरु आहे.

शनिवारी सकाळी स्थानिकांना हे अर्भक आढळले. यानंतर आशा स्वयंसेविकेने या नवजात मुलीला घेऊन. पोलिसांना याविषयी माहिती दिली. यानंतर मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलीची प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात आले आहे. तर या गोंडस मुलीला टाकून देणाऱ्या निर्दयी मातेचा शोध पोलीस घेत आहेत.

Loading...

महत्वाच्या बातम्या –

- Advertisement -

Loading...
You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.