“हिंदूविरोधी अभिनेत्यांचा एक गट नेहमीच हिंदूंच्या भावना…” : अनंत कुमार हेगडे

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खानने टायरच्या एका जाहिरातीत लोकांना दिवाळीच्या काळात रस्त्यावर फटाके न फोडण्याचा सल्ला दिला आहे. मात्र यावर भारतीय जनता पार्टीचे खासदार अनंत कुमार हेगडे यांनी आक्षेप घेत आमिर खानवर टीका केली आहे.

खासदार अनंत कुमार हेगडे यांनी या प्रकरणी कंपनीचे एमडी आणि सीईओ अनंत वर्धन गोयेंका यांना एक पत्र पाठवत या जाहिरातीची दखल घेण्याची विनंती केलीय. या पत्रात अनंत म्हणाले, “आमिर खान लोकांना गल्ल्यांमध्ये फटाके न फोडण्याचं आवाहन करत आहे अशी तुमच्या कंपनीची नवी जाहिरात खूप चांगला संदेश देणारी आहे. या समस्येवर तुम्ही व्यक्त केलेल्या चिंतेचं कौतुक करायला हवं. त्याचप्रमाणे मी तुम्हाला आणखी एक समस्या मांडण्याची विनंती करतो. ती म्हणजे शुक्रवार आणि इतर सणांच्या दिवशी मुसलमानांनी नमाजच्या नावाने रस्ते जाम करणं” असं ते पत्रात म्हणाले.

पुढे त्यांनी जाहिरातीवरून आमिर खानवर देखील निशाणा साधला आहे. “आजकाल, हिंदूविरोधी अभिनेत्यांचा एक गट नेहमीच हिंदूंच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र ते कधीही त्यांच्या समाजाच्या चुकीच्या कृत्यांवर भाष्य करत नाहित.” असं ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा