कुही परिसरात भीषण अपघात, चौघांचा मृत्यू, सात जखमी

नागपुरातील जिल्ह्यातील कुही परिसरात भीषण अपघात झाला आहे. या अपघाता चौघांचा मृत्यू झाला. नागपूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने रेतीच्या उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेतमध्ये चार जण जागीच ठार तर 7 जण जखमी आहेत. पाच जणांवर ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

सध्या राज्यभरात जोरदार पाऊस बसरत आहे. यामुळे रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नागपूर जिल्ह्यातील कुही परिसरातही असाच भीषण अपघात झाला. भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची रेतीच्या ट्रकला जोरदार धडक झाली आणि यामध्ये 4 जण ठार झाले. रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Loading...
महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.