शार्दुल ठाकुरच्या साखरपुड्याचे फोटो आले समोर; लवकरच अडकणार लग्नबंधनात

मुंबई : गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असणार भारताचा क्रिकेटपटू शार्दुल ठाकुर याचा आज साखरपुडा पार पडला आहे. शार्दुल ठाकुरने त्याची मैत्रीण मिताली परुलकर हिच्यासोबत साखरपुडा केला आहे. शार्दुलच्या साखरपुड्याचे फोटोज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

मुंबईतील वांद्रा-कुर्ला संकुलात शार्दुल आणि मितालीच्या साखरपुड्याचा सोहळा पार पडला. शार्दुलने त्याचे कुटुंबीय आणि निकटवर्तीय अशा 75 जणांच्या उपस्थित साखरपुडा केला आहे. आज साखरपुडा केल्यानंतर शार्दुल आणि मिताली एक वर्षांनी लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चाही सोशल मीडियावर रंगत आहे. अनेक चर्चांनुसार ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकानंतर शार्दुल आणि मिताली लग्नगाठ बांधणार आहेत.

दरम्यान शार्दुल ठाकुरने किंग्ज एलेव्हन पंजाब टीममधून आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर शार्दुल आयपीएलमध्ये चेन्नई टीमच्या वतीने खेळला होता. सध्या शार्दुल भारतीय संघाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळत आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा