सुयश-आयुषीकडून चाहत्यांना सुखद धक्का, हळदीचा समारंभ नुकताच पाडला पार

मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘शुभमंगल ऑनलाईन’ फेम अभिनेता सुयश टिळकने त्याची गर्लफ्रेंड आयुषी भावेच्या वाढदिवसादिवशी चाहत्यांना खुशखबर दिली आहे. आयुषी आणि सुयशच्या मेहंदी आणि हळदीचा कार्यक्रम नुकताच पार पडला आहे.

सुयशने नुकताच त्याच्या गर्लफ्रेण्डसोबत हळदीचा समारंभ पार पाडला आहे. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला आहे. दोघांनीही इन्स्टाग्रामवर त्यांच्या हळदीचे फोटो स्टोरीला शेअर केले आहेत. जुलै महिन्यात दोघांनी चाहत्यांना सुखद धक्का देत साखरपुडा केला होता. त्यावेळी देखील त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते.

आयुषी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अशात सुयशसोबतच आयुषीनेही हळदीचे फोटो शेअर केले आहेत. आयुषी भावे ही 2018 मध्ये महाराष्ट्राची श्रावणक्वीन किताबाची मानकरी ठरली होती. त्यानंतर आयुषीने मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं युवा डान्सिंग क्विन या टीव्ही शोमध्ये आयुषी सहभागी झाली होती. आयुषी भावे लवकरच मराठी सिनेसृष्टीतही पदार्पण करणार आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा