A. R. Rahman | पुणे पोलिसांनी प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांचा शो बंद पाडला; नक्की काय आहे प्रकरण

A. R. Rahman | पुणे : काल रात्री (30 एप्रिल) पुण्यामध्ये प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांचा गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा शो राजाबहादूर मिल परिसरात होता. तर रहमान येणार म्हटल्यावर त्याचे हजारो चाहते या शोला हजर झाले होते. परंतु शो रंगात येताच पुणे पोलिसांनी ए. आर. रहमान यांचा स्टेजवर येऊन शो बंद पाडला. कारण वेळेपेक्षा अधिक काळ हा कार्यक्रम सुरू राहिल्याने पोलिसांनी कार्यक्रम बंद पाडला असल्याचं सांगण्यात आलं आहे.

शो बंद पडताच रहमान काही न बोलता निघून गेले ( A R Rahman secretly left )

पोलिसांनी रहमान यांचा शो बंद पाडत त्याला चांगलंच सुनावलं आहे. यामुळे त्यांच्या चाहत्यांचा चांगलाच हिरमोड झाला. 10 वाजल्यानंतरही ए. आर. रहमान याची गाणी सुरूच होती. त्यामुळे पोलीस निरीक्षकाला हा शो बंद पाडावा लागला.  रात्री 10 वाजल्यानंतरही तुम्ही शो सुरूच कसा ठेवू शकता? रात्री 10 नंतर कार्यक्रम करण्यास कोर्टाने मनाई केलेली आहे हे तुम्हाला माहीत नाही काय? अशा शब्दात पोलिसंनी रहमान यांना सुनावले. त्यानंतर रहमान यांनी पोलिसांशी कोणताही वाद न घालता स्टेजवरून निघून गेले.

दरम्यान, या कार्यक्रमासाठी ए आर रहमानचे हजारो चाहते कार्यक्रमला आले होते. पुणेशहर तसचं पिंपरी चिंचवड आणि आजूबाजूच्या गावातील लोकांनी देखील हजेरी लावली होती. त्याच्या गाण्यावर सर्वजण नाचत होते. टाळ्या, शिट्या वाजवत होते. कार्यक्रम रंगात आल्यानंतर हा प्रकार घडला यामुळे युवकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या-