मी निवडणूक लढवणार ही एक अफवा; वीरेंद्र सेहवाग चा खुलासा

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग क्रिकेटनंतर आता राजकीय मैदानावर फलंदाजी करण्याची शक्यता आहे. भाजपाच्या तिकीटावर विरेंद्र सेहवाग लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरु आहे. पण या चर्चेला वीरेंद्र सेहवागने पूर्ण विराम दिला आहे
वीरेंद्र सेहवागने सोशल मीडियावर याबाबतचा खुलासा केला आहे त्याने आपल्या ट्विटर अकाउंट वर ट्विट करून मला निवडणूक लढवण्यात रस नाही असे सांगितले आहे. मी निवडणूक लढवणार ही एक अफवा होती असेही त्याने स्पष्ट केले आहे.
तसेच २०१४ लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा अशी अफवा पसरवण्यात आली होती. तशीच अफवा २०१९ च्या निवडणुकीत पसरवली जात असल्याचे त्याने सांगितले.
Some things never change, like this Rumour. Same in 2014, and no innovation even in Rumour in 2019. Not interested then, not interested now. #BaatKhatam#5YearChallenge pic.twitter.com/XhY7TkxfpD
— Virender Sehwag (@virendersehwag) February 8, 2019