InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

शेतकऱ्यांचं विराट वादळ मुंबईच्या दिशेने रवाना

टीम महाराष्ट्र देशा : शहापूर येथील भातसा नदीच्या किनारी मुक्काम केल्यानंतर अखिल भारतीय किसान सभेचा विराट मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. भातसा नदी ते भिवंडीतील भिनार गाव पर्यंतचे अंतर पार करुन मोर्चेकरी दुपारचे जेवण करुन पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

आज भातसा नदी ते मुंबई ढाबा भिवंडी असं जवळपास ३० ते ३५ किलोमीटरचे अंतर शेतकरी पाया चालणारेत आणि आज रात्री ठाणे शहराच्या प्रवेशद्वारा जवळ येऊन मुक्काम करणार आहेत.

अधिवेशन सुरू असल्याने किसान सभेतर्फे मुंबई येथे विधानभवनाला १२ मार्चला घेराव घालण्यात येणार आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबई येथे विधानसभेला घेराव घालण्याकरिता अखिल भारतीय किसान सभेच्या पुढाकारातून निघालेल्या मोर्चात सुमारे बारा हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी किसान सभेच्या नाशिक-मुंबई मोर्चाला सुरुवात करण्यात आली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.