InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

केळवादजवळ एका तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ

नागपूर जिल्ह्यातील केळवादजवळ  एका तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. खुशी परिहार (20) असे मृत तरुणीचे नाव असून शनिवारी तिचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणाचा नागपूर ग्रामीण पोलिसांनी छडा लावला आहे. प्रियकरानेच खुशीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह झुडपात फेकून दिल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आश्रफ शेख (28) असे आरोपीचे नाव आहे.

खुशी ही हायफाय विचारसरणी होती. ती मॉडेलिंगच्या क्षेत्रात वावरणारी होती. तिला उच्चभ्रु लोकांमध्ये राहायला आवडत होते. त्यामुळे तिचं असं वागणं तिच्या आई- वडिलांही खटकत होते. आई-वडिलांशी फारसे पटत नसल्याने ती मावशीकडे राहायला गेली होती. मावशीच्या घरी राहात असतानाही ती जास्त वेळ बाहेरच राहत होती. या काळात तिची ओळख आश्रफ शेखशी झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र, काही दिवसांच काही कारणावरून दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply