InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मंत्रालयाच्या दारातच एका महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न..!

मुंबईतल्या मंत्रालयाच्या दारातच एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चेंबूरच्या  एका महिलेने पेटवून घेण्याचा केला प्रयत्न केला. मुलीच्या लग्नासाठी खाजगी सावकाराकडून  घेतलेल्या कर्जाची परतफेड करूनही खाजगी सावकाराने लावला तगादा लावल्याचा या महिलेचा आरोप आहे.

स्थानिक पोलीस चौकशी करत नसल्याने या महिलेने मंत्रालयाच्या दारातच स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा केला प्रयत्न. मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले SRPF चे जवान हवालदार डी. के. माने आणि  पोलीस शिपाई के.डी.राऊत यांनी  वेळीच महिलेच्या हातातून रॉकेल ची बाटली काढून घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

या आधीही काही दिवसांपूर्वी एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरुन या तरुणाने उडी मारली, मात्र सुदैवाने खाली लावलेल्या संरक्षक जाळ्यांमध्ये हा तरुण अडकला आणि त्याचे प्राण बचावले.

तसेच २२ जानेवारी २०१८ राजी अशीच एक घटना मंत्रालयात घडली होती शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विषप्राषन करून आत्महत्या केली होती. धर्म पाटील याना त्यांचा जमिनीचा योग्य तो मोबदला सरकारकडून मिळत नसल्याने त्यांनी मंत्रालय गाठले पण त्यांना योग्य तो न्याय मिळत नसल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

महत्वाच्या बातम्या –

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.