InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

भाजप नेत्याच्या खोट्या आश्वासनामुळे एका तरुणाची आत्महत्या…

भाजपा नेते आणि लोकविकास सहकारी बॅंकेचे संस्थापक जे.के. उर्फ जगन्नाथ खंडेराव जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला  आहे कृष्णा ऊर्फ किशोर रतन चिलघर या तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी या भाजप नेत्या गुन्हा दाखल झाला आहे. कृष्णा हा जाधव यांच्याकडे वाहन चालक (ड्राइवर) म्हणून काम करत होता. या भाजप नेत्याने दिलेल्या खोट्या आश्वासनांमुळे कृष्णाने आत्महत्या केली असे स्पष्ट झाले आहे.

लोकविकास बँकेचे संस्थापक अध्यक्ष आणि भारतीय ग्रामीण पुर्नरचना संस्थेचे अध्यक्ष जे.के जाधव यांच्याकडे कृष्णा दोन वर्ष कार ड्राइवर म्हणून काम करत होता. मासिक १० हजार रुपये पगारावर तो काम करायचा. जाधव यांनी कृष्णाला संस्थेअंतर्गत असणाऱ्या राजर्षी शाहू इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या चिकलठाणा एमआयडीसीतील संस्थेत शिपाई पदावर नोकरी लावून देतो असे खोटे आश्वासन दिले. या मोबदल्यात त्यांनी तीन लाख रुपयांची मागणीही केली. तीन लाख रुपये नसल्याने कृष्णाने लोकविकास नागरी सहकारी बँकेतून कर्ज घेतले.

कृष्णा संस्थेत शिपाई म्हणून रुजू झाला होता. कृष्णाने जून २०१७ रोजी जाधव यांना एक लाख ६० हजार रुपये दिले होते. तर शिपाई पदावर कायम झाल्यावर उर्वरित रक्कम (१ लाख ४० हजार) देण्याचे ठरले होते. जाधव यांनी कृष्णाकडून दोन कोरे चेक घेतले होते. सहा महिन्यांनी म्हणजेच ३० डिसेंबर २०१७ रोजी कृष्णाने शिपाई पदावर कायम करण्याबाबत व पगाराबाबत जाधव यांच्याकडे विचारणा केली. उर्वरित रक्कम दिल्यावरच पदावर कायम केले जाईल, असे जाधव यांनी कृष्णाला सांगितले. यावरुन दोघांमध्ये वाद झाला आणि शेवटी जाधव यांनी कृष्णाला कामावरुन काढून टाकले. ७ फेब्रुवारी २०१८ रोजी त्याने जाधव यांच्याकडे नोकरीसाठी दिलेल्या पैशांची मागणी केली. त्यावेळी जाधव यांनी पैसे परत देण्यास नकार दिला. तसेच त्याला धमकी देखील दिली.

आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत कृष्णा म्हणतो.

कृष्णाने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली होती. यात तो म्हणतो, ‘जे. के. जाधव व विक्रांत जाधव हे दोघेही पिता-पुत्र आहेत. त्यांनी आपल्या नावावर लोकविकास बँकेतून एक लाखाचे कर्ज घेतले. त्यांना एक लाख साठ हजार रुपये दिल्यानंतर देखील माझ्यावर अन्याय करुन कलम १३८ नुसार कोर्टात खटला दाखल केला. मी पोलिसात तक्रार करुनही त्याचा काहीही उपयोग झाला नाही. फक्त पैसा चालतो, गरीब माणसाला न्याय भेटत नाही. जिन्सी पोलिस ठाण्यात दोन महिने चकरा मारल्या. पण त्याचा काही फायदा झाला नाही. उलट माझ्याविरुध्द दाखल केलेल्या गुन्हयाचा तपास उगले व काकडे यांच्याकडे सोपवण्यात आला. या दोघांनी आपल्याकडे वीस हजारांच्या लाचेची मागणी केली. पण माझ्याकडे पैसे नव्हते. मी हा प्रकार निरीक्षक हाश्मी यांना सांगितला. तेव्हा त्यांनी उपायुक्त श्रीरामे यांचे रेकॉर्डींग ऐकवले. जे. के. जाधववर काहीही कारवाई करायची नाही. तर बँकेचे औटी, सुर्यवंशी आणि उमेश दिवे हे कायम मारुन टाकायच्या धमक्या देत आहेत. त्यामुळे मी परेशान आहे. स्वत:ला संपवत आहे’, असे त्याने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.