Aadhar Card Update | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय नागरिकांसाठी पासपोर्ट जेवढा महत्त्वाचा आहे, तेवढेच महत्त्वाचे आहे आधार कार्ड. आधार कार्ड हे भारतीयांसाठी सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुमची अनेक कामे खोळंबु शकतात. त्यामुळे आधार कार्डवरील नाव, पत्ता, फोटो इत्यादी माहिती अचूक असणे महत्त्वाचे आहे. जर तुमच्या आधार कार्डमध्ये काही चूक असेल तर ती बदलण्यासाठी तुमच्याकडे 15 जून पर्यंतचा वेळ आहे. 15 जून पर्यंत तुम्ही घरबसल्या आधार कार्ड अपडेट करू शकतात.
Last Chance for Free Aadhaar Card Update!
तुम्हाला जर तुमचे आधार कार्ड अपडेट (Aadhar Card Update) करायचे असेल, तर तुम्ही घरबसल्या 15 जून पर्यंत ऑनलाईन पद्धतीने ते अपडेट करू शकतात. यासाठी तुम्हाला myAadhaar या पोर्टलला भेट द्यावी लागेल. 15 जून पर्यंत तुम्ही या पोर्टलवर मोफत आधार अपडेट करू शकतात. त्यानंतर तुम्हाला माहिती बदलण्यासाठी शुल्क आकारला जाईल. तुम्ही फक्त ई-आधार पोर्टलद्वारे विनामूल्य अपडेट करू शकतात. आधार केंद्रावर तुम्हाला यासाठी 50 रुपये शुल्क भरावा लागतो.
आधार अपडेट कसे करायचे? (How to Update Aadhaar?)
- आधार अपडेट करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम मोबाईल नंबरच्या मदतीने लॉग इन करावे लागेल.
- लॉग इनसाठी तुम्हाला https://uidai.gov.in/en/my-aadhaar/update-aadhaar.html या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करून ओटीपी टाकावा लागेल.
- ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपडेट करण्यासाठी डॉक्युमेंट सिलेक्ट करून व्हेरिफाय करावे लागेल.
- यानंतर तुम्हाला ड्रॉप लिस्टमध्ये तुमचा आयडी प्रूफ आणि ऍड्रेस प्रूफ स्कॅन करून अपलोड करावा लागेल.
- ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करावे लागेल.
- नंतर तुम्हाला विनंती क्रमांक मिळेल आणि आधार अपडेट फॉर्म सबमिट केला जाईल.
- रिक्वेस्ट नंबरद्वारे तुम्ही तुमच्या आधार अपडेटची स्थिती जाणून घेऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या
- Gautami Patil | “बाईला पुरुषी वासनेसाठी नाचावे…”; गौतमी पाटीलबद्दची शाहीर संभाजी भगत यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत
- BGMI Update | Gamers साठी आनंदाची बातमी! लोकप्रिय गेम BGMI पुन्हा होणार प्ले स्टोअरवर उपलब्ध
- IPL 2023 | आयपीएल चॅम्पियन्सवर पैशाचा पाऊस! कुणाला किती मिळणार रक्कम? जाणून घ्या
- IPL 2023 Closing Ceremony | ‘हे’ दिग्गज कलाकार असणार IPL च्या क्लोजिंग सेरेमनीचे आकर्षण
- Indian Railway | भारतीय रेल्वेच्या ‘या’ चुकीमुळे शेतकरी बनला ट्रेनचा मालक; वाचा सविस्तर
Original NEWS SOURCE – https://bit.ly/43qNaPu