Aaditya Thackeray | “एकनाथ शिंदेंनी गद्दारीचं आज बारावं कारण दिलंय”; आदित्य ठाकरेंची शिंदेंवर आगपाखड
Aaditya Thackeray | मुंबई : आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत असून त्यात विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येणार आहेत. त्याआधी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. ‘हे सरकार घटनाबाह्य आहे, खोके घेऊन गद्दारी केली’ असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.
“एकनाथ शिंदेंनी गद्दारीचं आज बारावं कारण दिलंय”
“आज राज्यपालांनी जे भाषण केलं त्यात महाविकास आघाडीच्या काळातलीच कामं आणि निर्णय होती. राज्यपालांचं भाषण ऐकून आम्हाला असं वाटलं की त्यांची दिशाभूल वगैरे केली का? असं आम्हाला वाटलं आहे त्याबाबत आम्ही माहिती घेणार आहोत. एकनाथ शिंदे काहीही म्हणू द्या.. त्यांनी सहा महिन्यात बारावं कारण दिलं पण एक लक्षात घ्या की गद्दार हे गद्दारच असतात” असं म्हणत आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
“जे गद्दार ते गद्दारच राहणार, तो शिक्का पुसला जाणार नाही”
एकनाथ शिंदे असं म्हणाले की, ‘देवेंद्र फडणवीस यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न झाला होता, तसंच त्यांना तुरुंगात टाकण्याची तयारी होती.’ याबाबत विचारलं असता आदित्य ठाकरे म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांनी मागच्या सहा महिन्यात गद्दारी करण्याचं हे बारावं कारण दिलं आहे. त्यामुळे आता काय बोलणार? एक लक्षात घ्या जे गद्दार आहेत ते गद्दारच राहणार त्यांच्यावरचा तो शिक्का पुसला जाणार नाही”, असं आदित्य ठाकरेंनी म्हणाले आहेत.
Aaditya Thackeray Criticize Eknath Shinde And Shinde Group’s MLA
“जे गद्दार बोलत आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. विविध घोषणा महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांमध्ये झाल्या आहेत. विविध वचनं देण्यात आली मात्र गद्दारांनी काहीही वचनं पूर्ण केली नाहीत”, असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. “आता लवकरच आम्ही तुमच्यासोबत येऊन बसतो. सभागृहात आम्ही जिथे बसायचं तिथेच बसलो होतो, गद्दार कुठे गेलेत ते त्यांनाच विचारा” असं म्हणत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना खोचक टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
- Raj Thackeray | “आज याच्याबरोबर फुगडी तर त्याच्याबरोबर झिम्मा”; राज ठाकरेंचा मिश्किल टोला
- Sanjay Raut | “शिंदे गटाचे 40 आमदार अपात्र ठरतील याची आम्हाला खात्री”; संजय राऊतांचा विश्वास
- Devendra Fadnavis | “भास्कर जाधव दम देऊन बोलतात”; देवेंद्र फडणवीस आक्रमक
- Shivsena | “हा न्यायदेवतेचा अपमान”; शिवसेनेनं ५५ आमदारांना व्हीप बजावल्यानंतर ठाकरे गटाचं प्रत्युत्तर
- Iron-Rich Fruits | निरोगी राहण्यासाठी आहारात करा ‘या’ आयरनयुक्त फळांचा समावेश
Comments are closed.