Aaditya Thackeray | राज्यात बंटी-बबली खूप झालेत, आदित्य ठाकरेंची राणा दाम्पत्यावर टीका

Aaditya Thackeray | अकोला : आदित्य ठाकरे यांनी आज विदर्भातील बाळापूर येथे सभा घेतली. यावेळी त्या आमदार नितीन देशमूख यांचे कौतुक केले. आदित्य ठाकरे म्हणाले, सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापल आहे. ही सभा नितीन देशमुख यांच्यासाठी आहे. ज्यांनी स्वत:ला विकलं नाही, मान सन्मान विकला नाही आणि आमच्या खांद्याला खांदा लावून उभे राहीले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर देखील हल्लाबोल केला. तसेच राणा दाम्पत्यावर टीका केली.

आदित्य ठाकरे म्हणाले, “या छोट्या पप्पूने तुम्हाला पळवून लावले आहे. तुम्ही केलेली गद्दारी महाराष्ट्राला पटलेली नाही. त्यामुळे तुम्हाला पळवून सोडणार. शिंदे गटातील आमदार म्हणतात, लग्नात गेले तरी एक ५० खोके एकदम ओके चिडवतात. त्यामुळे त्यांनी वर्षा बंगल्यावर बोलवून घेतले होते. मात्र पुन्हा दोन आमदार भांडले. हे बंटी बबली महाराष्ट्रात खूप झाले.”

अब्दुल सत्तारांना प्रत्युत्तर – 

“मला छोटा पप्पू म्हणाले, असेल मी छोटा पप्पू, पण मला नावं ठेऊन महाराष्ट्राची सेवा होत असेल तर मला आणखी शंभर नावं ठेवा, आणि महाराष्ट्राची सेवा करा. या छोट्या पप्पूने तुम्हाला महाराष्ट्रभर पळवून लावले की नाही ? आणि असेच पळवत ठेवणार, पळवून लावणार, तुम्ही जी गद्दारी केली ती गद्दारी महाराष्ट्राच्या जनतेला पटलेली नाही”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.