Aaditya Thackeray | मुंबई : शिवसेनेचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळी विधानसभेतून निवडणूक लढविण्याचे आव्हान दिले त्यानंतर शिंदे गटाकडून ते आव्हान स्विकारण्यात आले. सोशल मीडियावरही याविषयाची चर्चा चांगलीच रंगली होती. यानंतर आज आदित्य ठाकरे यांनी या विषयी शिंदे गटाला पुन्हा डिवचलं आहे.
“माझ्या वक्तव्यावरुन बरीच चर्चा झाली. सोशल मीडियावर देखील हाच विषय होता. एक नक्की हिला दिया. एवढ्या सर्व लोकांना पुढे करण्याऐवजी त्यांनी स्वतःच सांगितले असते की लढायची हिमंत नाही. तरी चालले असते.” असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. यावरुन आता एकनाथ शिंदे किंवा शिंदे गटाचे नेते यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
“लढायची तयारी नाही एवढंच सांगायचं होतं”
“चाळीस लोकांनी कुठूनही राजीनामा देऊ द्या किंवा महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक घ्या, आम्ही तयार आहोत. पण आमची लढायची तयारी नाही, एवढं सांगितलं असतं तरी चाललं असतं. त्यासाठी भाजपला आणि त्यांच्या सोशल मीडियाला सक्रीय करण्याची काय गरज होती? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वेदांता फॉक्सकॉनबाबत उत्तर आलेले नाही, डाव्होसबाबत काही वक्तव्य आलेले नाही. मात्र इतर गोष्टीवर लगेच त्यांच्याकडून उत्तरं येतात”, असेही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
आदित्य ठाकरेंचं ओपन चॅलेंज (Aaditya Thackeray’s Open Challenge)
“मी वरळीतून राजीनामा देतो. घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देऊन माझ्यासमोर वरळीतून उभे राहावे. निवडून कसे येतात ते मी बघतोच. जी काही यंत्रणा लावायची ती लावा. जी काही ताकद लावायची ती लावा. जेवढे काही खोके वाटायचे ते वाटा पण एक सुद्धा मत विकलं जाणार नाही. एकही शिवसैनिक विकला जाणार नाही. त्यांना पाडणारच” असं खुलं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.
शीतल म्हात्रेंनी उचलला पैजेचा विडा (Sheetal Mhatre Accept the Challenge)
“आदित्य ठाकरे तुम्ही वरळीतून आव्हान देत आहात हे ऐकलं. तुम्ही आव्हान देण्याची गरज नाही. एवढीच इच्छा असतील तर एकनाथ शिंदे साहेबांचे जे कट्टर सैनिक आहेत, आमच्यासारखी लोकं ते तुमच्यासोबत लढायला तयार आहेत. पराभव व्हावा अशी तुमची इच्छाच असेल, तर आम्ही तुमच्याविरोधात लढायला तयार आहोत. एकनाथ शिंदे यांना तुमच्या विरोधात लढण्याची गरज नाही’, असे म्हणत शीतल म्हात्रे यांनी आदित्य ठाकरेंच्या पैंजेचा विडा उचलला होता. याबाबत शीतल म्हात्रे यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावरुन आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.
“आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा” (Shahajibapu Patil Comment on Aaditya Thackeray)
“आदित्य ठाकरे यांनी लवकरच राजीनामा द्यावा आणि मंजूर करुन घ्यावा. त्यांनी टीव्हीवर आव्हान देऊ नये. पटकन राजीनामा लिहायचा आणि राज्यपालांकडे द्यायचा. मग मैदानात उतरण्याचे आव्हान द्यावे. आम्ही बारक्या मुलाकडून त्यांचा पराभव करु”, असे प्रतिआव्हान शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी खास आपल्या शैलीत दिले होते.
“एखाद्या फाटक्या माणसाकडून आम्ही तुमचा पराभव करुन दाखवू”- Shahajibapu Patil
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सर्वसामान्य कार्यकर्ता आदित्य ठाकरेंचा वरळीत दारूण पराभव करेल. त्यासाठी एकनाथ शिंदे यांची गरज नाही. एखाद्या फाटक्या माणसाकडून आम्ही तुमचा पराभव करुन दाखवू कारण तुम्ही हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सोडून सत्येसाठी ज्या पद्धतीने तीन वर्षात उलाढाली केल्या. त्या महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या कुठल्याही शिवसैनिकाला आणि शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या माणसाला आवडलेल्या नाहीत”, असे शहाजीबापू पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
- Chandrashekhar Bawankule | “आणखी वेळ आहे, उमेदवार बदलता येईल”; बावनकुळेंचं विरोधकांना पुन्हा आवाहन
- By Poll Election | कसबा पोटनिवडणुकीत ‘मविआ’चा उमेदवार ठरला; काँग्रेसने दिली ‘या’ नेत्याला उमेदवारी
- Supriya Sule | “राज्यात वडील पळवायची शर्यत सुरुय, रेकॉर्ड करून ठेवा, शरद पवार माझेच वडील आहेत”; सुप्रिया सुळेंची कोपरखळी
- Jitendra Awhad | “रामायणातून रावण काढून मग श्रीराम समजून सांगा”; जितेंद्र आव्हाडांच्या ट्वीटने नवा वाद
- Shivsena | “दानवेंची नगरसेवक होण्याची पण पात्रता नाही”; शिंदे गटाची दानवेंसह ठाकरे, आव्हाडांवर बोचरी टीका