‘युवा आमदार, कामं जोरदार’; आदित्य ठाकरे आणि रोहित पवारांनी केली मतदारसंघात कामं सुरु

राज्यात ठाकरे सरकार स्थापन होऊन अनेक दिवस झाले तरी अद्याप खातेवाटप झालेला नाहीये. ठाकरे सरकार यांनी अजून काम सुरु केले नाही का असा सवाल सध्या उपस्थित होत आहे तर दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे युवा चेहरे आता कामाला लागले आहेत. आदित्य ठाकरे आणि रोहित पवार दोन्ही युवा आमदार जोरदार कामला लागले आहेत.

आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यंदा पहिल्यांदाचा विधानसभेची पायरी चढले. आणि हे दोघे नेते  सत्तानाट्य संपल्यानंतर सरकार स्थापन झालं आणि त्यानंतर लगेच या दोन्ही तरुण आमदारांनी आपापल्या मतदारसंघात काम आणि योजनांची आखणी सुरु केली आहे

यावर्षी 30 हून अधिक तरुण आमदारांची फौज विधानसभेत पोहोचली आहे. आदित्य ठाकरे, रोहित पवार, ऋतुराज पाटील, राम सातपुते, देवेंद्र भुयार, संदीप क्षीरसागर असे असंख्य आमदार नव्या उमेदीचे आहेत. त्यात प्रामुख्यानं आदित्य ठाकरे आणि रोहित पवारांनी आपापल्या मतदारसंघात कामं आणि योजनांचा धडाका सुरु केला आहे.

वरळीत आदित्य ठाकरेंची कामे – 

वरळीत आदित्य ठाकरेंनी ए प्लस मोहीम हाती घेतली आहे.कचरामुक्त वरळीसाठी एकूण नवी 70 ठिकाणं तयार होणार आहेत. वरळीच्या सर्व चौकांचं नूतनीकरण आणि सुशोभीकरण हाती घेतलं आहे. त्याशिवाय वरळी सीफेसचं नूतनीकरण, रस्ते अशी अनेक कामं या मोहिमेत राबवली जाणार आहेत

रोहित पवारांचा पवार पॅटर्न –

कर्जत-जामखेडमधला जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न रोहित पवार यांनी हाती घेतला गेला आहे. शिवाय कुकडी प्रकल्पात गेलेल्या शेतजमिनींचा मोबदलाही मिळण्यास सुरुवात झाली आहे. कुकडी प्रकल्पासाठी जमिनी संपादीत केल्या होत्या. मात्र 25-30 वर्ष होऊनही त्याचा मोबदला सरकार दरबारी अडकून पडला होता. मात्र आता पहिल्या टप्प्यात 62 लाभार्थींना 6 कोटी 85 लाखांचे धनादेश देण्यात आले आहेत. याशिवाय कर्जत तालुक्यांतील मंदिरांच्या विकासासाठी अभिनेता मिलिंद गुणाजींच्या माध्यमातून नवी योजनाही राबवली जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.