Aamir Khan | लेकीनं हिंदू जोडीदार निवडला म्हणून आमिर खान झाला नेटकऱ्यांकडून ट्रोल

मुंबई: बॉलीवूड सुपरस्टार आमिर खान (Aamir Khan) याची मुलगी इरा खान (Ira Khan) आणि तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे (Nupur Shikhare) यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर शुक्रवारी साखरपुडा (Engagement) केली. एकीकडे इरा आणि नुपूर यांच्या साखरपुड्याचे फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तर दुसरीकडे लेकीने एका हिंदू मुलाशी साखरपुडा केला म्हणून नेटकरी आमिर खानला ट्रोल करत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, बॉलीवूड अभिनेता आमिर खान याची मुलगी इरा आणि नुपूर यांची 2020 मध्ये ओळख झाली होती. नुपूर शिखरे हा एक जिम ट्रेनर आहे. नुपूरने आमिर खान आणि इतर अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींना जिममध्ये ट्रेनिंग दिली आहे. त्याचबरोबर 2020 मध्ये झालेल्या लॉकडाऊनमध्ये नुपूर इराला फिटनेस ट्रेनिंग देत होता. दरम्यान, ते दोघे जवळ आले आणि त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. शुक्रवारी या दोघांचा साखरपुडा पार पडला आहे.

आमिर खान आणि त्याचे कुटुंब एकीकडे इराचा साखरपुडा साजरा करत असताना. दुसरीकडे नेटकऱ्यांनी आमिर खानला त्याच्या मुलीने एका हिंदू मुलाशी साखरपुडा केला म्हणून ट्रोल करायला सुरुवात केले आहे. यामध्ये एक नेटकरी म्हणाला आहे, “पहिले गजनी चित्रपट बनवला असा हा स्वतःच गजनी झाला आहे.” तर आणखी एक नेटकरी कमेंट करत म्हणाला आहे की,”यासाठी अल्ला तुला कधीच माफ करणार नाही.” अशा प्रकारच्या अनेक टीका करत नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे.

सप्टेंबर महिन्यामध्ये एका कार्यक्रमादरम्यान नुपूरने इराला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. इराने इंस्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर केला होता. त्याचबरोबर इरा आणि नुपूर यांच्या साखरपुड्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये इराणी लाल रंगाचा ड्रेस परिधान केलेला असून नुपूरने पूर्ण काळा रंगाचा टॅक्सीडो परिधान केल्याचे दिसत आहे. या दोघांच्या या खास प्रसंगासाठी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीजने हजेरी लावली होती.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.