InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘सिक्रेट सुपरस्टार’चा टिझर रिलीज

आमिर खानच्या  आगामी ‘सिक्रेट सुपस्टार’ सिनेमाचा टिझर रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमासाठी आमिरने अतिशय वेगळा लूक केला आहे. ‘सिक्रेट सुपरस्टार’ या सिनेमाची निर्मिती आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव हिने केली असून यात आमिरची भूमिकाही आहे. अद्वैत चंदन यांनी या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. यात झायरा वसीम, मेहेर विज, राज अर्जुन, तिर्थ शर्मा, कबिर शेख यांच्या भूमिका आहेत.
यात एका सर्वसामान्य मुलीची कथा दाखवण्यात आली असून तिला तिचे स्वप्न पुर्ण करायचे आहे. पण तिच्या वडीलाना ते मान्य नाहीये. मग अशात ही मुलगी कशाप्रकारे आपली स्वप्ने पूर्ण करते. त्यासाठी कुणाची मदत घेते. हे सर्व या सिनेमात बघायला मिळणार आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.