InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

…आणि गौतम गंभीर विरोधात निवडणूक लढवणाऱ्या आपच्या ‘त्या’ उमेदवार रडल्या

- Advertisement -

सहाव्या टप्प्यात दिल्लीतील सर्व जागांवर मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार केला आहे. दरम्यान पत्रकार परिषदेत आपच्या उमेदवार आतिशी यांनी गौतम गंभीरने काढलेले एक पत्रकच वाचून दाखवले. त्यामधील आक्षेपार्ह टिप्पणी वाचताना आतिशी या भावूक झाल्या आणि त्यांना रडू कोसळले.

पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातील आम आदमी पार्टीच्या उमेदवार आतिशी यांनी गुरुवारी भाजपा उमेदवार गौतम गंभीर यांच्यावर निशाणा साधला आहे. अतिशी यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली.

गेल्या काही दिवसांत प्रचारादरम्यान आतिशी यांनी गौतम गंभीर यांना शिकाऊ असल्याचे संबोधले होते. गौतम गंभीर यांची प्रसिद्धी त्यांच्याविरोधातच जाईल. कारण, मोठ्या व्यक्तींना लोक फक्त पाहतात. मात्र, त्यांच्यासाठी जो वेळ देईल, त्यालाच प्रतिनिधी म्हणून निवडतात, असेही आतिशी म्हणाल्या होत्या.

- Advertisement -

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.