InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

जगबुडी नदीच्या पाणीपातळीतही वाढ; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

जिल्ह्यात पडत असलेल्या दमदार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. खेड तालुक्यातील जगबुडी नदीच्या पाणीपातळीतही वाढ झाली असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई-गोवा महामार्गावरच्या या जगबुडी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली.

बुधवारी रात्री 8 च्या सुमारास जगबुडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान जगबुडी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याचे समजताच खेडचे तहसीलदार शिवाजी जाधव तसेच पोलिसांनीही पुलाकडे धाव घेतली. नदीच्या एकूण पाणीपातळीचा अंदाज घेऊन हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूला पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply