InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

अबब! मुख्यमंत्र्याच्या विमानप्रवासावर ‘एवढा’ खर्च

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांच्या विमानप्रवासावर कोट्यावधी रूपये खर्च झाला असून सध्या याचीच चर्चा सुरू आहे. २०१४ ते २०१९ या कालावधीत मुख्यमंत्री फडणवीसांच्या विमान प्रवासावर कोट्यावधी रूपये खर्च झाल्याची माहिती उघडकीस आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टर, चॉपर, खासगी जेट विमानाच्या वाहतुकीसाठी तब्बल ५७ कोटी ६२ लाख १८ हजार रुपये खर्च आला आहे. माहिती अधिकारात ही माहिती नितीन यादव यांना मुख्यमंत्री सचिवालयातून देण्यात आली आहे.

- Advertisement -

राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांना अनेकवेळा विमान अथवा हेलिकॉप्टरने प्रवास करावा लागतो. सरकारकडे स्वत:च्या मालकीचे छोटे विमान आणि हेलिकॉप्टर आहे. गेल्या साडेचार वर्षात या हेलिकॉप्टरमध्ये वारंवार बिघाड झाले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या प्रवासासाठी खासगी जेट विमानाचा वापर करण्यात आला.

वर्ष                          खर्च
२०१४-१५         ५,३७,६३,६१८
२०१५-१६         ५,४२,८१,६४६
२०१६-१७         ७,२३,६८,९५०
२०१७-१८         ६,१३,०३,६८५
याच वर्षात      १३,२४,२१,८०३
२०१८-१९        २०,२०,७८,३१३
एकूण             ५७,६२,१८,०१५

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.