Abdul Sattar | “आम्ही मागितलेली ढाल-तलवार आम्हाला मिळाली अन्…”; अब्दुल सत्तारांचा उद्धव ठाकरे गटावर हल्ला

Abdul Sattar |  मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह आयोगाकडून गोठवण्यात आले असून दोन्ही गटाला पक्षाच नवं नाव आणि चिन्हं तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलं आहे. यामध्ये एकनाथ शिंदेंच्या गटाला मिळालेल्या ‘ढाल-तलवार’ या चिन्हावरून शिख बांधवांनी आक्षेप घेतला आहे. यावर शिंदे गटातील नेते आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी  या चिन्हाबाबतच्या शंकांचं निरसन निवडणूक आयोग (Election Comission) करेल, असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणाही साधला आहे.

काय म्हणाले अब्दुल सत्तार 

आम्ही मागितलेली ढाल-तलवार आम्हाला मिळाली. दुसऱ्यांना आग लावण्यासाठी मशालही मिळाली, असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरे गटावर सडकून वार केला आहे. सत्तार म्हणाले, “आमची ढाल छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. स्वराज्यातील जनतेला आणि गडकिल्ल्यांना महाराजांनी ढाल-तलवारीनेच संरक्षण दिलं होतं. ही ढाल-तलवार ईडीची असू शकत नाही. त्यावेळी ईडी नव्हती” तसेच बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) गटाला युतीची ऑफर दिली आहे. यावर बोलताना अब्दुल सत्तार ( Abdul Sattar ) म्हणाले की, प्रकाश आंबेडकरांना उद्धव ठाकरेंचं हिंदूत्व मान्य असेल, तर पुढच्या निवडणुकीसाठी त्यांचं काहीतरी नियोजन असेल.

दरम्यान, निवडणूक आयोगाने त्रिशुळ हे चिन्ह जसं धार्मिक आहे म्हणून वगळलं तसं ढाल-तलवार हे चिन्ह शिख धर्मियांशी संबंधित आहे, असा आक्षेप त्यांनी घेतलाय. नांदेड येथील गुरुद्वारा बोर्डाचे रणजितसिंग कामठेकर यांनी असं भाष्य केलं आहे.

त्याचबरोबर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) याच्या शिवसेनेला ‘मशाल’ हे चिन्ह देण्यात आलं आहे. मात्र, ठाकरे गटाला देण्यात आलेल्या मशाल या चिन्हावर समता पार्टीने (Samata Party) दावा ठोकला असून ते आता यासाठी हायकोर्टात जाणार आहेत.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.