Abdul Sattar | “चंद्रकांत खैरे लंगडा माणूस” खैरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर अब्दुल सत्तारांचा पलटवार

Abdul Sattar | मुंबई : अब्दुल सत्तार यांना गाडल्याशिवाय राहणार नाही, असं वक्तव्य करत उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर निशाणा साधला होता. अब्दुल सत्तार हा हिरवा सापच आहे. तो हिरवा सापच नसून रंग बदलणारा सरडा आहे, तो आधी हिरवा साप होता. आता सरडा झाला आहे, अशी टीकाही खैरे यांनी केली होती. याच पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर पलटवार केला आहे.

काय म्हणाले अब्दुल सत्तार (Abdul Sattar)

जो स्वत: गाडला गेला आहे तो मला काय गाडणार? चंद्रकांत खैरे लंगडा माणूस आहे, असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अब्दुल सत्तार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

खासदार नाही आमदार नाही त्यांच्याकडे (चंद्रकांत खैरे) काय आहे. त्यांना गाडण्याचं काम मीच केलं आहे, आणि पुढेही गाडणार असल्याचं सत्तार यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना सत्तार असं म्हणाले की, खैरे हा झिरो माणूस आहे. त्याची काय चर्चा करायची. त्यांना मी लोकसभा निवडणुकीलाच दाखवून दिलं हिरवा आहे की काळा. ते साध नगरपालिकेला जरी उभे राहिले तरी निवडून येऊ शकणार नाहीत. अशा व्यक्तीच्या टीकेला उत्तर देण योग्य होणार नाही.

तसेच, अब्दुल सत्तार यांनी बोलताना पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचे सुपूत्र आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. आदित्य ठाकरे हे जेव्हा गोधडीत होते तेव्हापासून मी राजकारण करत आहे. माझं वय आता 62 वर्ष असल्याचं सत्तार यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.