Abdul Sattar “छोटा पप्पू आत्ता जे बोलतोय…”; अब्दुल सत्तारांची आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका

Abdul Sattar । हिंगोली : टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. अशातच आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात बोलताना शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडले. “खोके सरकारवर उद्योग जगताचा विश्वास उरलेला नाही”, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली होती. यावरून आता राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंचा  ‘छोटा पप्पू’ असा उल्लेख केला आहे.

काय म्हणाले अब्दुल सत्तार?

अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंना ‘छोटा पप्पू’ छोटा पप्पू म्हणत खोचक टोला लगावला आहे. ते म्हणाले, “खरंतर मला आश्चर्य वाटतंय आदित्य ठाकरेंचं. तो प्रकल्प कधी गेला? कसा गेला? कोणती तारीख होती? हे जर बारकाईनं त्यांनी पाहिलं तर त्यांच्या सगळं लक्षात येईल. २१ सप्टेंबर २०२१ ला हा प्रकल्प गुजरातला गेला. तेव्हा कोण मुख्यमंत्री होते? त्यांचे वडील मुख्यमंत्री होते. जे बोलत आहेत, ते तेव्हा कॅबिनेट मंत्री होते”, असं अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.

“या व्यवहारात त्यांच्याशी देवाण-घेवाण बरोबर झाली नाही का? यावरही लोक प्रश्न विचारू लागले आहेत. छोटा पप्पू आत्ता जे बोलतोय, ते जर आधी बोलले असते, तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती”, अशा शब्दांत सत्तार यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला.

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?

टाटा एअरबस निर्मिती प्रकल्प गुजरातला होणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्यावरून आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं. “टाटा एयरबस प्रकल्प’ महाराष्ट्राबाहेर जाऊ नये यासाठी प्रयत्न करा, अशी मागणी मी जुलै महिन्यापासून सातत्याने करत होतो. पण, पुन्हा तेच झालं. गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने महाराष्ट्रातले प्रकल्प बाहेर का जात आहेत? खोके सरकारवर उद्योगजगताचा विश्वास उरलेला नाही, हे तर दिसतच आहे. आता ४ प्रकल्प महाराष्ट्रातून निसटल्यावर तरी उद्योगमंत्री राजीनामा देणार का?” असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला होता.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.