Abdul Sattar | “…नाहीतर उद्धव ठाकरेंची शिवसेना दुर्बीणीने बघावी लागेल” ; अब्दुल सत्तारांचा खोचक टोला
जालना : उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मानावं आणि जुळवून घ्यावं असं वक्तव्य कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. जालन्यात हिंदूगर्वगर्जना मेळाव्याचं आयोजन केलं होतं. यावेळी ते बोलत होते. जुळवून घेतलं नाही तर उद्धव ठाकरेंची शिवसेना दुर्बीणीने बघावी लागेल, असं टोला देखील सत्तार यांनी लगावला.
एकनाथ शिंदे २०१४ मध्ये आमच्याकडे सत्ता स्थापनेसाठी आले होते, असा गौप्यस्फोट अशोक चव्हाणांनी केला होता. त्यावर सत्तार म्हणाले, “मी स्वत: त्यावेळी काँग्रेसमध्ये होतो. आम्हीच एकनाथ शिंदे यांच्याकडे सत्ता स्थापनेची विनंती घेवून गेलो, होतो. त्याचबरोबर चंद्रकांतं खैरे यांना गणिताची टोटलच कळत नाही असं म्हणत सत्तार यांनी खैरेंवर देखील टीका केली.
अशोक चव्हाण काय म्हणाले?
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेबाबत मोठा खुलासा केला आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवल्याचा दावा अशोक चव्हाण यांनी केला. त्यावेळी मी शिंदे यांना युतीबाबत शरद पवारांना भेटण्याचा सल्ला दिला होता, असे चव्हाण यांनी म्हटले आहे. अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्रातील नांदेडमध्ये हे वक्तव्य केले आहे.
एकनाथ शिंदे यांचे बंड-
अशोक चव्हाण यांचे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानानंतर आले आहे. ज्यात शिंदे यांनी दावा केला आहे की शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत युती केल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड केला. या बंडखोरीनंतर शिंदे यांनी या वर्षी जूनमध्ये भाजपसोबत सरकार स्थापन केले. यानंतर शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाविकास आघाडीचे सरकार पडले. मात्र अशोक चव्हाण दाव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | “ज्यांच्या स्वतःबद्दल…”; अशोक चव्हाणांच्या दाव्यावर शिंदे गटाचा पलटवार!
- मोठी बातमी : T20 वर्ल्ड कपमधून जसप्रीत बुमराह संघाबाहेर
- Arjun Khotakar | चंद्रकांत खैरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर शिंदे गटाचे स्पष्टीकरण म्हणाले…
- Instagram Account Recovery | Instagram अकाउंट Hack झाल्यावर काय करायला पाहिजे,जाणून घ्या!
- Chandrashekhar Bawankule | सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार, म्हणाले…
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.