Abdul Sattar | पीक पाहणी दौऱ्यादरम्यान अब्दुल सत्तारांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं, “दारू पिता का?”
Abdul Sattar | बीड : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांकडून सतत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. यावर राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, ‘सध्या राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती नाही’. त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण आणखिनच गरम झालं आहे. अशातच अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी बीड (Beed) जिल्ह्याचा दौरा.
काय म्हणाले अब्दुल सत्तार (Abdul Sattar)
दौऱ्यावर असताना अब्दुल सत्तार, अर्जून खोतकर आणि काही अधिकारी चहा पिण्यासाठी बसले होते. तेव्हा जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी ‘चहा कमी पितो,’ असं म्हटलं. त्यावर अब्दुल सत्तारांनी “दारू पिता का?”, असा प्रश्न विचारला. त्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर हशा पिकला.
अतिवृष्टी पाहणी दौरा कि मद्यसृष्टी पाहणी दौरा?
गम का दौर हो या हो खुशी, समा बाँधती है शराब
किसान मरे या करे खुदकुशी, समा बाँधती है शराब
एक मशवरा है जनाब के थोड़ी-थोड़ी पिया करो
हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो 🤔 pic.twitter.com/UDZsfypmAO— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) October 27, 2022
तसेच, जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न विचारल्यानंतर मोबाईलचा कॅमेरा सुरु असल्याचं पाहून सत्तार काहीसे गोंधळले. त्यांनी मोबाईलचा कॅमेरा बंद करण्यास सांगितला. परंतू हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्याचबरोबर व्हिडीओ पाहून अनेकांच्या संतप्त प्रतिक्रियाही येत आहेत.
व्हायरल होत असेलेला व्हिडीओ काँग्रेस पक्षाचे (Congress) प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Savant) यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. “अतिवृष्टी पाहणी दौरा कि मद्यसृष्टी पाहणी दौरा? गम का दौर हो या हो खुशी, समा बाँधती है शराब किसान मरे या करे खुदकुशी, समा बाँधती है शराब एक मशवरा है जनाब के थोडी-थोडी पिया करो हुई महँगी बहत ही शराब, के थोडी-थोडी पिया करो”, असं म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- MNS । नोटेवरील बापूंच्या फोटोवरून राजकारण तापलं ; मनसेने मांडली भूमिका
- Big Boss Marathi | बिग बॉस मराठी 4 मध्ये अमृता फडणवीसांची एन्ट्री
- Skin Care Tips | ‘या’ घरगुती गोष्टी वापरून चेहऱ्यावर आणा चमक
- Supriya Sule | “हे सरकार असंवेदनशील, ओला दुष्काळ जाहीर करा” ; सुप्रिया सुळे संतापल्या
- Houseboat Destination | भारतामध्ये ‘हे’ आहेत परफेक्ट हाऊसबोट डेस्टिनेशन
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.