Abdul Sattar | मराठवाडा दौऱ्यावरून अब्दुल सत्तारांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला, म्हणाले…
Abdul Sattar | मुंबई : अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पीकांचे खूप नुकसान झाले आहे. याची पाहणी करण्याकरीता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मराठवाडा (Marathwada) दौऱ्यावर आहेत. यावरून सत्ताधारी पक्षनेत्यांनी त्यांच्यावक टीका करायला सुरूवात केली आहे. अशातच एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेते तथा राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर चांगलाच हल्ला केला आहे.
काय म्हणाले अब्दुल सत्तार (Abdul Sattar)
मी त्यांच्या दौऱ्यातील मिनीट टू मिनीट कार्यक्रम पाहिला त्यानंतर असं दिसून आलं की 24 मिनिटांसाठी ते शेतकऱ्यांची विचारपूस करणार आहेत. आता यावेळेत ते किती पाहातील, काय पाहातील, किती ओला दुष्काळ पाहातील, असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. अब्दुल सत्तारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
सत्तार म्हणाले, मला हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आता परतीचा पाऊस संपलेला आहे. उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने दौरा काढला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानेल. किमीत कमी यंदा तरी अडीच वर्षानंतर त्यांचा दौरा शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत येऊ लागला, याबद्दल त्यांना धन्यवादच द्यावे लागतील. 22-24 मिनिटं का असेना पण आले पाहणी करतील आणि ज्या सूचना ते मांडतील त्याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निश्चितच विचार करतील.
पुढे बोलताना त्यांनी असंही सांगितले की, मी स्वत:चं कौतुक करत नाही, परंतु मी 69 तालुके आणि विशेषता 9 जिल्हे फिरलो हे सर्व माध्यमांनी दाखवलं. जेव्हापासून मी पदभार स्वीकारला, तेव्हापासून मेळघाट ते मराठवाड्याच्या शेवच्या टोकापर्यंत, कोकणापासून ते उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रापर्यंत अशाप्रकारे ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. सकाळी ७ वाजेपासून ते कधीकधी रात्र होत परंतु शेतकऱ्यांशी मी चर्चा करतोय. शेतकऱ्यांनी अजिबात निराश होऊ नये, त्यांच्या पाठिशी महाराष्ट्र सरकार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Mohammed Shami : मोहम्मद शमी भारत-पाक सामन्यात गोलंदाजी करणार नाही; या माजी खेळाडूने सांगितले मोठे कारण
- Ajit Pawar | “…त्यापेक्षा त्यांनी सरळ रांगेत उभं राहावं”, अजित पवारांना ‘या’ आमदाराचा खोचक सल्ला
- Raju Shetti | “पन्नास हजार रुपये तुमच्या पन्नास खोक्यांपुढे…”; अब्दुल सत्तारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून राजू शेट्टी आक्रमक
- Viral Video | चक्क लाइटिंगची साडी नेसलेल्या ‘या’ महिलेचा व्हिडिओ झाला व्हायरल
- Eknath Shinde | “एकनाथ शिंदेंचा रामदास आठवले होणार”, शिंदे गटातील नेत्यानेच केला मोठा दावा
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.