Abdul Sattar | “मी नाराज नाही…”, कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचं स्पष्टीकरण
Abdul Sattar | मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचा काल गुवाहाटी (Guwahati) दौरा होता. मात्र, या दौऱ्याला अनेक नेते जाणार नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अशातच कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) देखील या दौऱ्यावर नसल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. यावरच आता अब्दुल सत्तारांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
नाशिक येथील कृषी प्रदर्शनाला येणे निश्चित होते. त्यामुळेच गुवाहाटीला जाऊ शकलो नाही. मी अजिबात नाराज नाही. आमचा मुख्यमंत्र्यांवर पूर्णपणे विश्वास आहे आणि आमचं सगळं चांगलं सुरू असल्याचं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कामाख्या देवीला जाण्यासाठी आजचाच दिवस आहे, असे नाही. नंतर कधी तरी जाईन. मुख्यमंत्री गुवाहाटीला गेले म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र गेल्यासारखेच आहे. मुख्यमंत्र्यांच्या मनगटात एवढा जोर आहे की, ते दुसऱ्याला भविष्य विचारण्यासाठी हात दाखवणार नाही, असं देखील ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray | “खोके सरकार जेंव्हापासुन खुर्चीवर बसलंय तेंव्हापासुन…”; उद्धव ठाकरेंची शिंदे सरकारवर बोचरी टीका
- Uddhav Thackeray | “हा पक्ष आहे का चोरबाजार?”; उद्धव ठाकरे यांचा भाजपवर घणाघात
- Abdul Sattar | कृषिमंत्री अब्दुल सत्तार गुवाहाटीला का गेले नाही? स्वत: दिले स्पष्टीकरण
- Uddhav Thackeray | “देवेंद्र जनाची नाही तर मनाची लाज बाळगा” ; उद्धव ठाकरे यांची आक्रमक टीका!
- Uddhav Thackeray | “तो एक अब्दुल ‘गटार’….” ; उद्धव ठाकरेंची सत्तारांवर खोचक टीका
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.