Abdul Sattar | ‘रस्त्यावर उतरू’ असा इशारा देणाऱ्या अंबादास दानवेंना अब्दुल सत्तारांनी दिलं प्रत्युत्तर म्हणाले..

Abdul Sattar | मुंबई : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येतं आहे. परंतू राज्यात ओला दुष्काळ करण्यासाठी परिस्थिती नसल्याचं राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं. यावर शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर, दिवाळीनंतर रस्त्यावर उतरु, असा इशारा ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danave) यांनी दिला आहे. या इशाऱ्याला अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी चांगलंच प्रत्युत्तर दिलं असल्याचं समजतं आहे.

काय म्हणाले अब्दुल सत्तार (Abdul Sattar)

त्यांनी नक्कीच रस्त्यावर उतरायला पाहिजे. रस्त्यावर उतरण्याचीच वेळ आली आहे. ज्यावेळी रस्त्यावर यायला पाहिजे होतं, शेतकरी, शेतमजूर, गरिबाला मदत करायला पाहिजे होती, ती मदत नाही केली म्हणून तर ही वेळ आली, असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी अंबादास दानवे यांच्यावर पलटवार केला आहे.

त्यांच्याकडे जी काही 55 आमदारांची फौज होती, त्यापैकी केवळ 15 आमदार राहिले आहेत 40 आमदार गेले आहेत. याचंही कुठंतरी चिंतन मंथन करायला पाहिजे. का गेले, कशामुळे गेले? आपण भविष्यात असं वागलो असतो. आता शाखांपर्यंत ते चालले पूर्वी मंत्र्याला, आमदाराला भेटायला वेळ नव्हता. परंतु आता ही परिस्थिती जी निर्माण झालेली आहे. त्यांनी रस्त्यावर उतरल्यावर थोडा घामा गाळावा, रक्त जाळावं आणि त्यांचा पक्ष मजबूत करावा, असंही सत्तार म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यात या वर्षी एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल चारवेळा अतिवृष्टी झाली असून याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे, सध्या शेतात गुडगाभर पाणी आहे, आताचे पीक तर हातातून गेले मात्र, पुढचं पीक देखील शेतकऱ्यांना घेता येते की नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.