Abdul Sattar | राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादांवर अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Abdul Sattar | नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली आहे. पवारानंतर सुप्रिया सुळे (Supriya Sule) राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी विराजमान होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. त्यावर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या आवडण्याने किंवा न आवडल्याने पक्षाला फरक पडला असता तर मी माझी प्रतिक्रिया दिले असती, असं अब्दुल सत्तार माध्यमांसोबत बोलताना म्हणाले आहे.

माध्यमांशी बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले (Abdul Sattar), “शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी काय करावं काय करू नये हे माझ्यासारखे कार्यकर्त्यांनी सांगायची गरज नाही. पक्षाबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार पक्ष प्रमुखाला असतो. त्यांनी तो निर्णय घेतला आहे आणि अंतिम निर्णय तेच घेऊ शकतात.”

वज्रमुठ सभेवर अब्दुल सत्तारांची प्रतिक्रिया (Abdul Sattar’s reaction to the Vajramuth sabha)

अब्दुल सत्तारांनी (Abdul Sattar) वज्रमुठ सभेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “वज्रमुठ अत्यंत मोठी झाली आहे. त्याचे परिणाम दिसत असतील, त्यामुळे मला फार बोलायची गरज आहे का? वज्रमुठ सभा कशामुळे रद्द झाल्या आहेत? उन्हामुळे रद्द झाल्या आहेत, की पक्षात ऊन जास्त झालं म्हणून रद्द झाल्या आहेत.”

दरम्यान, ट्विटरवर पोस्ट करत असीम सरोदे यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष निवडीची तारीख जाहीर केली आहे. त्याचबरोबर त्यांनी नवीन सरकार स्थापन होणार, असा दावा केला आहे. त्यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

ॲड. असीम सरोदे यांचे ट्विट, “राष्ट्रवादीचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष,अध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी 10 मे च्या आधी नक्की होतील.
11 मे नंतर नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग येणार हे सुद्धा नक्की.”

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.